Home > News Update > ये रिश्ता क्या कहलाता है? दानवे-सत्तारांची दिल्लीत गळाभेट

ये रिश्ता क्या कहलाता है? दानवे-सत्तारांची दिल्लीत गळाभेट

ये रिश्ता क्या कहलाता है? दानवे-सत्तारांची दिल्लीत गळाभेट
X

सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.

मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तो, आत्ता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना? ,अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

काय म्हणाले होते सत्तार....

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात", असं अब्दुल सत्तार म्हणाले हो

Updated : 5 Jan 2022 11:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top