Home > News Update > Aaj Tak चे कॅमेरामन वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...

Aaj Tak चे कॅमेरामन वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...

मुंबई 'आज तक' चे प्रतिनिधी वैभव कनगुटकर हे लाईव्ह वार्तांकन करताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे.

Aaj Tak चे कॅमेरामन वैभव कनगुटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन...
X

घोडबंदर ठाणे येथील राहणारे वैभव कनघुटकर वय 45 हे मुंबईवरून आज तक या वाहिनीसाठी लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी अंबाजोगाई येथे रात्री राज हॉटेल येथे मुंबईहून आलेल्या पत्रकारांसोबत मुक्कामी होते.

सकाळी सात वाजता बाहेर पडून लाईव्ह वार्तांकन केल्यानंतर पंचायत समिती आंबेजोगाई येथील बुथवर वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर असलेल्या त्यांच्या मित्रास मला ऍसिडिटी त्रास होतोय गोळी घेऊन ये म्हणून मेडिकल वर पाठवले तो गोळी घेऊन येण्याच्या अगोदरच वेदना तीव्र झाल्याने त्यांना इतर पत्रकार बांधवांनी प्रथम जवळच असलेल्या हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे घेऊन जा म्हटल्यामुळे त्यांना स्वार्थी मध्ये घेऊन आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


घरदार सोडून लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार वैभव यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार असून त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ठाणे येथे पाठविला जाणार आहे व तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळी सकाळी नऊ वाजता नात्रा येथे पंकजा मुंडे यांचे मतदान करतानाचे लाईव्ह वार्तांकन सर्व न्यूज चैनल च्या टीमला करायचे होते ते तीन गाड्या सह आठ ते दहा लोक आले होते. मात्र वैभव कनगुटकर यांच्या अकाली निधनाने हे सर्व वार्तांकन स्थगित केले.

काल रात्रीच पत्रकार वैभव यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवसामुळे पत्नीशी व्हिडिओ कॉलवर कुटुंबीयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ते रात्री झोपले होते आणि आज सकाळी त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा आघात आहे.

वृत्तवाहिनीचे पत्रकार असो किंवा प्रिंट माध्यमचे पत्रकार हे फिल्डवर असताना दिवस-रात्र विविध वार्तांकनासाठी धावपळ करत असतात. कुटुंबियापासून दूर राहतात पत्रकारांचे खडतर जीवन हे फक्त सर्वसामान्यांना सूचना मिळाव्या लवकर माहिती मिळावी यासाठी झिजत असते मात्र फिल्डवर काम करत असताना अशी अचानक दुर्घटना घडली तर त्यांच्याजवळ त्यांचे कुटुंबीय नसते यापेक्षा पत्रकारांचे दुर्दैव काय?

Updated : 13 May 2024 3:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top