Home > News Update > मुंबईत महिला पोलिसानेच दिली पोलीस कॉन्स्टेबलच्या खुनाची सुपारी

मुंबईत महिला पोलिसानेच दिली पोलीस कॉन्स्टेबलच्या खुनाची सुपारी

मुंबईत महिला पोलिसानेच दिली पोलीस कॉन्स्टेबलच्या खुनाची सुपारी
X

मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असलेल्या शिवाजी सानप यांचा १५ ॲागस्ट रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू संशयास्पद वाटल्याने पनवेल पोलिसांनी तपास सुरूच केला होता. आता या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. शिवाजी सानप यांच्या खुनाची सुपारी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलनेच दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद गेऊन ही माहिती दिली.


सीसीटीव्ही फुटेजमुळे मारेकरी गजाआड

याप्रकरणात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एका नॅनो गाडीने मागून येवून शिवाजी सानप यांना उडवले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पनवेल पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासल्यानंचर दोन व्यक्तींनी शिवाजी सानप यांचा मुंबईतून पाठलाग केल्याचे दिसून आले. या जोन्ही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले.



हत्येसाठी दिली सुपारी, पुरावे केले नष्ट

या हत्येमागे मुंबई पोलीसात काम करणाऱ्या शिपाई शितल पानसरे असल्याचे समोर आले. शितल पानसरे यांनी या हत्येची सुपारी दिल्याचे कबूली दिली आहे. मयत शिवाजी सानप व शितल पानसरे हे मुंबईतील नेहरू नगर पोलिस स्टेशनमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये एका प्रकरणावरुन वादावादी झाली होती. यावादाचा बदला घेण्यासाठी शितल पानसरेने या हत्येचा कट रचला होता. या हत्येसाठी वापरण्यात आलेली नॅनो कार पुरावा नष्ट करण्यासाठी तळघर येथील निर्जन स्थळी जाळून टाकण्यात आली. पनवेल पोलिसांनी अतिशय शिताफीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपी शीतल पानसरे, विशाल जाधव व गणेश चव्हाण या तिघांना अटक केलीय.


Updated : 9 Sept 2021 3:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top