Home > News Update > विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास
X

राज्यातील ग्रामीण भागात काही गावांना आणि त्या गावातील एखाद्या वस्तीला जोडणारा पूल नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांच्या अशा समस्या मॅक्स महाराष्ट्र सातत्याने मांडत आहे, असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी या गावातील विद्यार्थ्यांना कमरेएवढ्या पाण्यातून शाळेत जावे लागते आहे.

या गावातील सावळा वस्ती ही गावापासून काही अंतरावर आहे. वस्तीवर पोहोचण्यासाठी एक ओढा पार करावा लागतो. ओढ्यावर पूल नसल्याने येथील नागरिक तसेच विद्यार्थी जीव मुठीत घेऊन या पाण्यातून प्रवास करत असतात. तसेच या ओढ्यापलिकडे अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. या शेतीत जाण्यासाठी देखील लोकांना या पाण्यातून जावे लागते. याबाबत अनेकदा मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.


Updated : 21 Sept 2022 12:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top