नव्या शैक्षणिक धोरणा विरोधात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन
X
डोंबिवली : केंद्र सरकारने भारतात नवे शैक्षणिक धोरण लागू केले. परंतु हे धोरण विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. संबंधित शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थ्यांना गुलाम करू पाहात आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचे खासगीकरण बाजारीकरण करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे सरकारचे धोरण असल्याने या शैक्षणिक धोरण २०२० यांच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने नवे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन १५ व १६ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथील सरस्वती विद्या भवन फार्मसी कॉलेज, शंकरनगर सोनार पाडा डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे.
शिक्षणाचे खासगीकरण व बाजारीकरण थांबविण्यात यावे. केंद्रीय व राज्य विद्यापीठांचे खासगीकरण थांबविण्यात यावे. विद्यार्थ्याचे लोकशाही अधिकार अबाधित राहण्यासाठी श्रीमंतांना शैक्षणिक कर लावण्यात यावे अशी या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून मागणी करणार असून या अधिवेशनामध्ये याबाबत विद्यार्थी व शिक्षक आणि सामाजिक संस्थांकडून चर्चा करून शासनाने आपल्या बाबी ऐकले नाही तर आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहे तसेच यावेळी भीमराव आंबेडकर, रेखा ठाकूर, प्रा. मृदुल निळे, डॉ. आर. वरदराजन, तापती मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.