Home > News Update > छत्रपती महाराजांचा खरा दागिना - इंद्रजित वसंतराव सावंत

छत्रपती महाराजांचा खरा दागिना - इंद्रजित वसंतराव सावंत

आज कोल्हापुरातील छत्रपतींचे निवासस्थान असणाऱ्या नवीन राजवाड्याच्या भव्य प्रांगणात 350 वा शिवराजाभिषेक पार पडला या शिवराजाभिषेकला समारंभ उपस्थिती लावली !

छत्रपती महाराजांचा खरा दागिना - इंद्रजित वसंतराव सावंत
X

आज 350 वा शिवराज्याभिषेक समारंभाच्या निमित्ताने करवीर छत्रपती श्री शाहू छत्रपती महाराज साहेबांनी आपल्या जामदार खाण्यातील अत्यंत मूल्यवान गोष्ट परिधान केली होती. शिवछत्रपती आपलं राज्य हे रयतेचा आहे . असं मानत असत आणि याचचेच प्रतीक म्हणून शिवाजी महाराज आपल्या गळ्यामध्ये कवड्याची माळ परिधान करीत असत. आज आपण नाटक चित्रपट किंवा अनेक चित्रकारांनी शिल्पकारांनी घडवलेल्या काढलेल्या चित्रांमध्ये शिवाजी महाराज परिधान करीत असलेली कवड्याची माळ ही सामान्य कवड्यांची असते .पण आज महाराज साहेबांनी परिधान केलेली माळ ही करवीर छत्रपती घराण्याने जतन केलेली आणि अत्यंत विशेष प्रसंगातच परिधान छत्रपती करतात अशा पद्धतीची माळ आहे . अशा पध्दतीच्या कवड्या या अत्यंत दुर्मिळ असून आजच्या काळात मिळणेही दुरापास्त आहे.

आज महाराज साहेबांनी ही कवड्याची माळ परिधान केली होती. महाराज साहेबांनी सुद्धा ही माळ या अगोदरच्या दोनच प्रसंगांमध्ये परिधान केली होती .अशी माहिती दिली .आज या ऐतिहासिक माळेचे जवळून दर्शन घेता आले.


Updated : 6 Jun 2024 10:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top