शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्तानंतर हेमंत सवरा यांची कुटुंबाला मदत
X
जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील भेंडीचापाडा या आदिवासी पाड्यातील दहावीत शिकणारा भावेश कृष्णा भुरकूट वय (17) याचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मोखाडा इथून खोडाळा येथे जाणाऱ्या नवीन मेनलाईनला शॉक लागून या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
सदरची घटना महावितरणाच्या गलथान कारभारामुळे घडली असताना दोन महिन्याचा कालावधी उलटूनही त्यांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने 'Ground Report : आदिवासींच्या जीवाची किंमत नाही का? कुटुंब २ महिन्यांपासून मदतीच्या प्रतिक्षेत' अशा ठळक मथळ्याखाली वृत्त दिलं होतं.
त्यानंतर या पीडित कुटूंबाला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भाजपाचे आदिवासी आघाडीचे सचिव हेमंत सवरा यांनी पीडित कुटूंबाची घटनास्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी हेमंत सवरा यांनी अन्नधान्यासह रोख स्वरूपात मदत केली. यावेळी या कुटूंबाला न्याय मिळवुन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच वेळप्रसंगी या कुटूंबासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातील भाजप रस्त्यावर उतरले असेही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.