Home > News Update > स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; सुमारे 330 किलो सुखी भांग जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; सुमारे 330 किलो सुखी भांग जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई;  सुमारे 330 किलो सुखी भांग जप्त
X

धुळे : धुळे शहरामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जवळपास 330 किलो सुकी भांग, करसह एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील माधव पुरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकी भांग आपल्या सोबत बाळगुन असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला असता , त्यामध्ये जवळपास अकरा गोण्या सुकी भाग आढळून आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले सुक्या भांगेची बाजारामध्ये किंमत जवळपास 3 लाख 99 हजार पाचशे रुपये इतकी मानली जात आहे. त्यासंदर्भात आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात संबंधित इसमास देण्यात आले असून पुढील कारवाई आझादनगर पोलिस करीत आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Updated : 16 Nov 2021 4:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top