Home > News Update > पुणे महानगरपालिकेची11 कर्मचाऱ्यांची एक टीम रायगडला रवाना

पुणे महानगरपालिकेची11 कर्मचाऱ्यांची एक टीम रायगडला रवाना

रायगड जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्ह्यातील उपाय योजना करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची11 कर्मचाऱ्यांची एक टीम रायगडला रवाना झाली आहे. पुरग्रस्तांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहे.

पुणे महानगरपालिकेची11 कर्मचाऱ्यांची एक टीम रायगडला रवाना
X

रायगड जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरल्यानंतर जिल्ह्यातील उपाय योजना करण्यासाठी राज्यातील विविध महानगरपालिका- नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी समन्वय साधत आहेत. असाच पध्दतीने रायगड येथे उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेती कर्मचारी पाठवण्याची मागणी पुणे महानगरपालिकेला केली होती. या मागणीला प्रतिसाद देत पुणे महानगरपालिका आपल्या 11 कर्मचाऱ्यांची एक टीम रायगडला पाठवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुण्याहून रायगडकडे जाणाऱ्या टीममध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ज्युनियर नर्स, हिवताप निरीक्षक, आया, नर्सिग ऑर्डली आदी 11 सेवकांचा समावेश असणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगरपालिकेच्या 2 मेडिकल ऑफिसर्स, 4 स्टाफ नर्सेस, 2 फार्मासिस्ट आणि 4 अटेंडेंट अशी वैद्यकीय टीम पुण्याहून रायगड, कोल्हापूर, कुपवाड, या भागात रवाना झाली.

ज्या ठिकाणी पाण्याच्या पंपिंग स्टेशनमध्ये पुराचे पाणी शिरून पाणी पुरवठा बंद झाला आहे तिथे पुण्यावरून पाण्याचे 17 टँकर पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पुरग्रस्तांचे दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून जी काही मदत लागेल ती येत्या काळात करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असेल असं यावेळी बोलतांना महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राज्यातील इतरही नगरपालिका- महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत रायगडला पुर्वपदावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुरग्रस्त भागात स्वच्छता करणे असो किंवा त्या भागात कोणत्याही प्रकारचे साथीचे रोग येणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत केले जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.i

Updated : 27 July 2021 6:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top