Home > News Update > जिंतूरमध्ये शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या

जिंतूरमध्ये शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या

जिंतूरमध्ये शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या
X

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील संभाजीनगर भागात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. राहूल उबाळे (३६) असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव असून ही घटना शनिवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. राहूल उबाळे यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आपलं जिवन संपवलं आहे.

राहूल उबाळे हे गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवरून आपल्या भावाला माहिती दिली होती. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता राहून उबाळे मृत अवस्थेत आढळले, त्यांनी घटनेची माहिती पोलीसांना तात्काळ दिली. घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली त्यानंतर राहूल उबाळे यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून उबाळे यांना मृत घोषीत केलं. नंतर पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. परंतू उबाळे यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट नाही झालं. जिंतूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहे.

Updated : 18 Feb 2024 11:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top