अनाथ मुलं कुठे राहतात यावरून भेदभाव करता येणार नाही- यशोमती ठाकूर
राज्यातील विविध अनाथाश्रम मध्ये राहत असलेल्या मुलांच्या आणि तरुणांच्या जात प्रमाणपत्राबाबत एक विशेष बैठक लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत दिले
X
राज्यातील विविध अनाथाश्रम मध्ये राहत असलेल्या मुलांच्या आणि तरुणांच्या जात प्रमाणपत्राबाबत एक विशेष बैठक लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत दिले याबाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला उत्तर देताना ठाकूर यांनी ही माहिती दिली.
राज्यात अनाथ मुलांच्या बाबतीत अ ब आणि क अशी वर्गवारी यापूर्वीच करण्यात आली आहे. अ श्रेणी मध्ये अनाथाश्रमात असलेल्या आणि दोन्ही पालक नसलेल्या मुलांचा समावेश आहे. ब श्रेणीमध्ये एक पालक असलेल्या मुलांचा समावेश आहे. तर क श्रेणीमध्ये नातेवाईकांकडे असलेल्या मुलांचा समावेश आहे. अनाथ मुलांना एमपीएससी परीक्षेत तसेच अन्य नोकरीसाठी जात प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे याबाबतीत नेमके काय करता येईल, यासाठी अधिवेशनानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक विशेष बैठक आयोजित करून मार्ग काढण्याचा निर्णय महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज विधानसभेत घेतला. त्याला फडणवीस यांनीही मान्यता दिली.