राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
X
नांदेड: राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत डीजेच्या तालावर डान्स करणे. एका पोलीस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले असून, रॅलीत नाचल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथं ही घटना घडली.
राम मंदिर निधी संकलनासाठी 14 फेब्रुवारी रोजी हदगावमध्ये रॅली काढण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. तर यावेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत गराड्यात सहभाग घेत नाचायला सुरवात केली. आता पोलीस निरीक्षकच डान्स करायला लागले म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले. रॅलीत डान्स करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नियंत्रण कक्षात बदली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली. त्यानंतर हनुमंत गायकवाड यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.तसेच चौकशीअंती त्यांची बदली करण्यात आली. हनुमंत गायकवाड यांची आता नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.