Home > News Update > लस घेतली तर घराबाहेर पडता येणार,अन्यथा...

लस घेतली तर घराबाहेर पडता येणार,अन्यथा...

लस घेतली तर घराबाहेर पडता येणार,अन्यथा...
X

औरंगाबाद: राज्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख खाली आणण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय आहे. त्यामुळे ३० एप्रिलनंतर लसीकरणासाठी पात्र असूनही ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी देणार नाही, असा इशारा औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.

पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहरातील नागरिकांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी, 'विकेंड लॉकडाऊ'न यशस्वी ठरत असून, शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याचं सांगितले.

तर, शहरातील ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस घेतली असेल तरच रस्त्यावर येऊ देण्याचा व व्यापाऱ्यांनी लस घेतली असेल तरच दुकाने सुरू करण्याचा निर्णय महापालिका घेण्याच्या विचार करत असल्याचं पांडे म्हणाले.

Updated : 19 April 2021 11:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top