Home > News Update > मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी, '१०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत'

मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी, '१०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत'

मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी, १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत
X

मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणाचे पडसाद आता मुंबईत देखील उमटायला सुरुवात झाली आहे. एकीकडे कणकवली पोलिसांनी राणे समर्थकांची धरपकड सुरु केली असताना मुंबईमध्ये राणे समर्थकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. दादर परिसरात संकेत बावकर यांनी '१०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही. वाघ हा वाघच असतो', असा मजकूर असलेला बॅनर झळकावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत शिवसेना विरुद्ध राणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्याचवेळी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हजर राहण्याची नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या सगळ्यांकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याविषयी माहिती असू शकते. त्यामुळे पोलिसांकडून या तिघांची चौकशी होऊ शकते.

कणकवली पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दुपारी तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, नारायण राणे याठिकाणी आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन घरावर नोटीस चिकटवतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान याबाबत भाजपकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणं महत्वाचे आहे.

Updated : 29 Dec 2021 4:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top