Home > News Update > संकुचित बुध्दीचा माणूस कधीही मोठा होत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना वर टीका..

संकुचित बुध्दीचा माणूस कधीही मोठा होत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना वर टीका..

बुलढाणा येथे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ शुध्दीकरणावरून शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

संकुचित बुध्दीचा माणूस कधीही मोठा होत नाही,  चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना वर टीका..
X

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी शिवाजी पार्क वरील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यानंतर शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाचे शुध्दीकरण केले. यावरून आता शिवसेना भाजप हा नवा वाद उफाळुन आला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत. सिंदखेड राजामध्ये बोलत असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ प्रकरणावरून शिवसेनेवर टीका केली आहे.

ते म्हणाले, "शुध्दीकरण करणं ही संकुचित लोकांची लक्षणे आहेत. कोणालाही त्याठिकाणी जाऊन दर्शन घेता येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे रक्षणकर्ते होते. त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन किंवा आदरांजली देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तेच केलं आहे.. परंतू शुद्धीकरण करून संकुचित बुध्दीचा माणूस कधीही मोठा होत नाही", अशी टीका बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तर जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे

Updated : 23 Aug 2021 1:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top