Home > News Update > पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 3000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार

पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 3000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार

पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर 3000 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार
X

पुणे : गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला असून दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या घरांमध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या प्रकल्पातील असणार आहेत अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

कोरोनाकाळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5,657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा देण्यात आला होता. यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

त्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 2500 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. आता दिवाळीत पुणे म्हाडाने पुन्हा एकदा 3000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व मोठ्या बांधकाम व्यवसायिकांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये मिळणार आहेत.मागील एक-दीड वर्षात आठ हजार घरांची सोडत काढण्यात आली आहे. यामुळे हजारो लोकांना चांगल्या प्रकल्पांमध्ये हक्काची घरे मिळाली आहेत.

Updated : 19 Oct 2021 9:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top