महाड MIDC तील कारखान्यात भीषण स्फोट
महाड MIDC तील कारखान्यात काल रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली. एकीकडे महाड येथे महापूराचं संकट असताना दुसरीकडे MIDC त स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे
X
महाड MIDC तील कारखान्यात काल रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली. स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली. विनती ऑरगॅनिक कारखान्यात ही घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद घटलेल्या या घटनेमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आधीच महाडमध्ये महापूराचं संकट असताना आता कारखान्याला भीषण आग लागल्याने सर्वत्र भीतीच वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी चे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
32 घरांवर कोसळली दरड ;72 जण अडकले
दरम्यान महाडच्या तळीये 32 घरांवर दरड कोसळली असून, 72 जण अडकल्याची माहीती समोर आली आहे. एनडीआरएफची टीम तळीयेकडे रवाना झाली आहे. चिपळूण शहरात पाणी शिरल्याने हजारो लोकं अडकले आहेत. संध्याकाळपासून लोकं मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र कुणाशीही संपर्क होत नसल्याने मदत कार्यास मोठ्या अडचणी येत आहेत. दरम्यान प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.