Ghatkopar Gujarati Name Board : घाटकोपर नावाची गुजराती पाटी, ठाकरे गटाकडून तोडफोड
X
गेल्या काही दिवसांपासून मराठी-गुजराती वाद चांगलाच पेटल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच आता घाटकोपरमध्ये गुजराती पाटी लागल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे.
मुंबईत मराठी महिलेला ऑफिस भाड्याने देण्यास नकार देण्यात आला होता. त्याविषयी अनेकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या. त्यातच आता घाटकोपरमध्ये गुजराती पाटी लावली आहे, त्यामुळे त्यावरून मोठा वाद पेटला आहे.
घाटकोपरमध्ये 'मारो घाटकोपर' असा फलक बागेत लावण्यात आला होता. त्यानंतर नवा वाद सुरू झाला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तेथे लावलेल्या गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड केली. त्यामुळे मारो घाटकोपर चा फलक काढून टाकण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. तसेच यावरून मनसेनेची आक्रमक भूमिका घेत ही पाटी काढून टाकण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे घाटकोपरच्या फलकावरून पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद पेटला असल्याचं चित्र आहे.