Home > News Update > अकोल्यात खाकीला काळीमा...रक्षकच झाले भक्षक, भाजपचा गंभीर आरोप

अकोल्यात खाकीला काळीमा...रक्षकच झाले भक्षक, भाजपचा गंभीर आरोप

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. त्यातच अकोल्यात पोलिसांकडून सराफावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावरून रक्षकच फक्षक झाले आहेत का?, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

अकोल्यात खाकीला काळीमा...रक्षकच झाले भक्षक, भाजपचा गंभीर आरोप
X

राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या सराफा व्यापाऱ्यावर पोलिसांकडून अनैसर्गिक अत्याचार झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे.

अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सराफा व्यापाऱ्याला ठेवले होते. तर त्याच्यावर पीएसआयसह हवालदाराने अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सराफा व्यापाऱ्याने केला आहे. त्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. तर खाकी रक्षक आहे की भक्षक असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

अकोला जिल्ह्यातील शेगावमधील चोरीच्या प्रकरणातील सोने खरेदी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर त्याला पोलिसांनी मारहाण केली. तर न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलिस कोठडी मिळाली. चोरीच्या प्रकरणातील दोन आरोपींना समोर आणण्यात आले आणि त्यानंतर पीएसआय नितीन चव्हाण आणि हवालदार शक्ती चव्हाण यांनी व्यापाऱ्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. तसेच हे प्रकरण दडवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोप व्यापाऱ्याने जामीन मिळाल्यानंतर केला आहे. यावरून चित्रा वाघ यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, राज्यात गुन्हेगारीचे सत्र संपता संपेना. ज्या पोलिसांकडे आपण तक्रार करायची तेच आता गुन्हेगार होत आहेत. तसेच चोरीचे सोने खरेदी केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या सराफा व्यापाऱ्यावर पोलिसांनी अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला आणि त्याच्या पायावर उकळते पाणी टाकून पाय भाजला. हे खाकी वर्दीतले रक्षक आहेत की खाकीला काळीमा फासणारे भक्षक, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तर आरोपी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्रीधर यांनी सांगितले.

Updated : 22 Jan 2022 8:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top