Home > News Update > अभ्यासासाठी रागावणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीने केली हत्या

अभ्यासासाठी रागावणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीने केली हत्या

अभ्यासासाठी रागावणाऱ्या आईची अल्पवयीन मुलीने केली हत्या
X

नवी मुंबई - अभ्यास करावा यासाठी आई सतत मागे लागते म्हणून चिडलेल्या मुलीने आईचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. शिल्पा जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील एका अल्पवयीन मुलीने कराट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कापडी पट्टयाने गळा आवळून आईची हत्या केली आहे. हत्येच्या तब्बल १० दिवसांनी हा प्रकार उघड झाला आहे. मुलगी डॉक्टर व्हावी म्हणून तिच्या आईने महागडे क्लासेस लावून दिले होते. मात्र मुलगी अभ्यास करत नाही, यावरून तिच्य़ात आणि आईमध्ये वारंवार वाद व्हायचे. याच कारणावरून मुलीला काही दिवस मामाकडेसुद्धा पाठवण्यात आले होते.

मात्र मामाकडून आल्यानंतरही या दोघींमधले वाद कायम होते. शेवटी मुलगी ऐकत नसल्याने 27 जुलै रोजी मुलगी आणि आईमध्ये मोठा वाद झाला. रागाच्या भरात आईने मुलीला मारहाण केली. तसेच आईने मुलीला धमकावण्यासाठी घरातील सुरी हातात घेतली. यात दोघींमध्ये झटापट झाली आणि याच झटापटीत आई बेडवर पडली. यानंतर रागाच्या मुलीने बाजूला असलेल्या कराटेंसाठी वापरला जाणारा कापडी पट्टा घेऊन आईची गळा आवळून हत्या केली.

आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच या मुलीने आईच्या मोबाईलवरूनच नातेवाईकांना आई आत्महत्या करत आसल्याचे भासवण्यासाठी मेसेज केले. मात्र पोलिसांना मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. त्यामध्ये हाती आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना संशय आला. शवविच्छेदनात तिच्या आईच्या डोक्यावर मार लागला असल्याचे निष्पन्न झाले आणि पोलिसांचा संशय आणखीन बळावला.

त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली आणि पोलीसी खाक्या पाहताच त्या मुलीने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने लगेच ताब्यात घेतले नसून, तिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

Updated : 10 Aug 2021 5:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top