Home > News Update > फुकट कपडे वाटण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड

फुकट कपडे वाटण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड

फुकट कपडे वाटण्याच्या बहाण्याने वृध्द महिलांना आडोश्याला नेवुन फसवुन अंगावरील दागीणे काढुन चोरणा-या टोळीचा भांडाफोड. हिंगोलीतील दोन गुन्हयांसह चिखली, अकोला, वाशिम येथील एकुण ०७ गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोलीची कार्यवाही

फुकट कपडे वाटण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड
X

हिंगोली / प्रतिनिधी : हिंगोली जिल्हयामध्ये मागील काही दिवसात वृध्द महिलांना हेरून गरीब लोकांना फुकट कपडे वाटप चालु आहे असे सांगुन महिलांना आडोशाला नेवुन तुमच्या अंगावरील दागीने पिशवीत काढुन ठेवा जेणेकरून तुम्ही गरीब दिसाल व तुम्हाला फुकट कपडे मिळतील असे सांगुन चोरटयांनी वृध्द महिलांची फसवणुक करून अंगावरील दागीने चोरल्यासंदर्भाने पो.स्टे. हिंगोली शहर येथे दोन गुन्हे दाखल होते.

सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्याच्या सुचना पो.नि. विकास पाटील, स्था.गु.शा. हिंगोली यांना दिल्यावरून, सपोनि. शिवसांब घेवारे स्था.गु.शा. हिंगोली यांचे पथक समांतर तपास करीत होते.

पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की वृध्द महिलांना फसवुन अंगावरील दाग-दागीने काढून घेणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे १) जयराम किसन पवार, वय ३४ वर्ष, रा. लिंबगाव, ता.जि. नांदेड, ह.मु. कलमुला, ता. पुर्णा, जि. परभणी, २) गणेश दादाराव मोरे, वय २४ वर्ष, व ३) प्रतिक दादाराव मोरे, वय २० वर्ष, दोन्ही रा. पुर्णा रेल्वे स्टेशन परिसर, पुर्णा, ता. पुर्णा, जि. परभणी हे असुन ते विशेषतः मुंबई परिसरात व महाराष्ट्रभर अशा प्रकारचे गुन्हे करीत असतात व आरोपी जयराम किसन पवार हा सध्या त्याच्या मुळगावी कलमुला, ता. पुर्णा, जि. परभणी येथे आहे अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेवुन पो.स्टे. हिंगोली शहर येथे दाखल असलेल्या दोन गुन्हयातील सोन्याचा मुद्देमाल गळयातील सोन्याच्या मप्या व कानातील कर्णफुले व गुन्हयात वापरलेले मोटार सायकल असा एकुण १,२२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी जयराम पवार याचेवर यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल असुन, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदशनाखाली सहा. पोलीस शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आइाम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली.

Updated : 1 March 2024 12:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top