Home > News Update > Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू

Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू

गेल्या काही दिवसात मुंबईत आगीच्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यातच भिवंडीतील फर्निचर गोदामाला आग लागली आहे. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Bhiwandi Fire : भिवंडीत अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू
X

मुंबईत गेल्या वर्षभरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच मुंबईतील भिवंडीमध्ये फर्निचर गोदामाला लागलेली आग मोठ्या प्रमाणावर पसरत असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडी शहरातील चामुंडा परिसरातील फर्निचर गोदामाला अचानक आग लागली. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका व अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी 4 फायर टेंडर आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेत जीवितहानीची माहिती मिळाली नाही.

भिवंडीतील चामुंडा परिसरातील फर्निचर गोदामाला लागलेली आग काही काळातच आणखी तीन गोदामांमध्ये पसरली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तर गोदाम जळून खाक झाले आहे. त्याबरोबरच अग्निशमन दलाच्या गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या काही दिवसात मुंबईत मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षभरात भिवंडीत विविध ठिकाणी कापड गोदाम, फर्निचर गोदामाला आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात मुंबईतील ताडदेव भागातील इमारतीला भीषण आग लागली होती. त्यात 6 नागरीकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील फर्निचर गोदामाला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली, याबाबत स्पष्टीकरण मिळालेले नाही. परंतू मुंबईतील आगींच्या घटना चिंताजनक आहेत.

Updated : 28 Jan 2022 8:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top