Home > News Update > एका कोंबड्याची बँड-बाजा लावून अंत्ययात्रा... गावाने दिला अखेरचा निरोप

एका कोंबड्याची बँड-बाजा लावून अंत्ययात्रा... गावाने दिला अखेरचा निरोप

एका कोंबड्याची बँड-बाजा लावून अंत्ययात्रा... गावाने दिला अखेरचा निरोप
X

माणसांचे आपल्या पाळीस प्राण्यांवरचे प्रेम वेगवेगळ्या घटनांमधून दिसत असते. कुत्रा, मांजर, बैल, गाय किंवा म्हैस यासारख्या पाळीव प्राण्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मालकांनी विविवत अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार आपण पाहिले आणि वाचले असतील. पण एका कोंबड्याची अंत्ययात्रा निघाली तर? आश्चर्य वाटले ना....पण हो हे खरे आहे... नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरमाळ येथील एका शेतकऱ्याने आपल्य़ा लाडक्या कोंबड्याचा मृत्यू झाल्यानंतर चक्क अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी केला. लळा लावलेल्या राजा नावाच्या कोंबड्यावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला निरोप देण्यात ला. यावेळी अंत्यसंस्कारात अनेक गावकरीही सहभागी होते.




दहा वर्ष मालकाला साथ देणाऱ्या राजा नावाच्या कोंबड्याला चार दिवसांपूर्वी मांजराने चावा घेतल्यानं हा कोंबडा जखमी झाला होता. या कोंबड्यावर बरेच उपचार करुनही कोंबडा वाचला नाही... गावांत सर्वत्र स्वच्छंद हुंदडत असलेला हा कोंबडा गावकऱ्यांना अत्यंत प्रिय होता. लोकांनी दिलेले भजे, मुरमुरे तो खात असे. या राजाच्या अचानक जाण्यानं मालक आणि गावकऱ्यांना दुखः झालं. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत राजा या कोंबड्याची लावून अंत्ययात्रा काढली. शंकर कोकले यांनी आपल्या कोंबड्यावर आपल्याच शेतात खड्डा तयार करुन विधीवत अंत्यसंस्कार केले. राजाच्या अंत्यविधीस मोठ्यासंख्येने गावकरी उपस्थित होते..

Updated : 27 July 2021 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top