Home > News Update > पुण्यातून ISIS शी संबंधित डॉक्टरला अटक, NIA ची मोठी कारवाई

पुण्यातून ISIS शी संबंधित डॉक्टरला अटक, NIA ची मोठी कारवाई

पुण्यातून ISIS शी संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली असून, NIA ने ही कारवाई केली आहे. यासंबंधात तपास यंत्रणांनी मोठा दावा केला आहे.

पुण्यातून ISIS शी संबंधित डॉक्टरला अटक, NIA ची मोठी कारवाई
X

ISIS या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA )पुण्यातील डॉक्टरला अटक केली आहे. अदनाली सरकार असे या डॉक्टरचे नाव असून त्याला पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केले आहे. पुण्यात राहणाऱ्या या डॉक्टरकडे ISIS या संघटनेत तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेला आहे. NIA च्या छाप्यात या डॉक्टरच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

काही दिवसापूर्वी पुणे पोलिसांनी नाकाबंदी करत असताना दोघा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS)केलेल्या चौकशीत यांच्या घरी देखील स्फोटकांशी संबंधित वस्तू सापडल्या होत्या. धक्कादायक म्हणजे दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयात सदर केलेल्या अहवालात या संशयित दहशतवाद्यांनी सातारा पुणे तसेच कोल्हापूर येथे स्फोटकांची चाचणी केल्याचे म्हटले आहे.

याच प्रकरणात NIA ने मुंबईतून ३ आणि ठाण्यातून एकास अटक केली आहे. महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेनंतर राज्याच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून या संशयितांचा नेमका प्लान काय होता यावर तपास सुरु आहे.

Updated : 27 July 2023 7:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top