राष्ट्रवादी भवनात चित्रपट विभागाच्या वतीने चर्चासत्र संपन्न
X
औरंगाबाद: शहरातील सिडको परिसरातील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलाकारांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष विजयराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चित्रपट दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना संकट काळात सर्व चित्रपट गृह , नाट्यगृह बंद आहेत त्यामुळे कलावंतांवर मोठं संकट ओढावले आहे, जरी सरकार आमचं असलं तरी येऊ घातलेल्या गणेश उत्सव, नवरात्र उत्सवात कला सादर करून कलावंतांची होणारी परवड थांबविण्याची विनंती आम्ही सरकारकडे करतो असं डॉ निकम यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. सर्व कलावंत सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून संकटामुळे जी मरगळ आली आहे ती दूर करण्यात येईल, लवकरच नाट्य आणि चित्रपट गृहांना परवानगी मिळेल अशी आशा आहे असही ते म्हणाले.
कलावंतांचे दोन वर्षात खूप नुकसान झाले मात्र कोरोना संसर्गाच संकट मोठ असल्याने त्याला पर्याय नव्हता मात्र आता राज्य शासन आपल्या पाठीशी असून पुन्हा एकदा जोरदार सुरुवात आपल्याला करायचे आहे असे डॉ. सुधीर निकम म्हणाले. यावेळी चित्रपट निर्माते राजूभाऊ रामराव कृष्णा शरणागत प्रा. ज्ञानेश्वर शिंदे प्रा. शवेता कल्याणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.