Home > News Update > महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
X

मुंबई// महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटच्या दोन दिवस शिल्लक असताना पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठीची निवडणूक दोन दिवसांत पार पडावी, शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. दरम्यान राज्यपालांनी उद्या निर्णय कळवणार असल्याचे सांगितल्याचे शिष्टमंडळातील नेत्यांनी सांगितले. राज्यपाल सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिला आहे. त्यांनी लवकर मंजूरी द्यावी, यासाठी त्यांची भेट घेतल्याचा नेत्यांनी सांगितले. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम उद्याच जाहीर करावा, अशीही त्यांना विनंती करण्यात आली.

दरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यपालांनी जे पत्र दिलं होतं सरकारला निवडणुकीबाबत, त्या अनुषंगानेच मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र आम्ही त्यांना दिलं आहे. या बाबतीत कायदेशीर चर्चा करुन यावर उद्या निर्णय कळवतो, असं त्यांनी म्हटलंय.

Updated : 26 Dec 2021 7:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top