आपकडून "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार सोहळ्यातील मृत्यूंसाठी "सदोष मनुष्यवध" गुन्हा दाखल, अॅड. असीम सरोदे प्रतिवाद करणार
X
Navi mumbai: खारघर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे १६ एप्रिल २०२३ रोजी अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जण जखमी झाले होते. या गंभीर घटनेची दडपशाही करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. मात्र, अजूनही दोषींवर साधा FIR दाखल करण्यात आलेलं नसल्याचं आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे एक्स च्या माध्यमातून प्रतिक्रीया दिली आहे.
या घटनेस जबाबदार असणाऱ्या आयोजक राज्य सरकारवर "सदोष" मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम आदमी पार्टीने मा. पनवेल न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखाली कलम १५६(३) नुसार खटला दाखल केला आहे. या खटल्याची आज शुक्रवार दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार असून स्वतः अॅड. असीम सरोदे प्रतिवाद करणार आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेते ऍड. जयसिंग शेरे सुद्धा या खटल्यात एकत्रपणे काम करत आहेत.
आम आदमी पक्षाची मागणी
संधीसाधू "शिंदे-फडणवीस" सरकारच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या शेकडो निष्पाप लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत लढा देईल.
सरकारने या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसानभरपाई द्यावी.
जखमी झालेल्यांच्या योग्य उपचारांची व्यवस्था सरकारने करावी.
भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पुरस्कार सोहळ्यांच्या आयोजनासाठी कठोर नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे