Home > News Update > अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीतांडव प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
X

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डला लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेरअहमद मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.

काल रात्री उशिरा अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर काल दिवसभर जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे फिर्याद दाखल करण्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर पोलिसांनी वाट पाहून स्वतःच फिर्याद देत या घटनेबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. भादवि कलम 304(अ) नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र एवढी मोठी घटना घडूनही जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याबाबत कोणतीही तसदी घेतली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान , या घटनेबाबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती स्वतंत्र चौकशी करेल आणि पोलीस विभागाकडून स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.

Updated : 7 Nov 2021 9:05 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top