समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्र पुरणाऱ्यावर गुन्हा दाखल
X
समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्र स्थापन करुन पाच कि.मी. परिसरात अपघात होणार नाही असा अवैज्ञानिक दावा करणाऱ्या निलेश आढाव याच्यावर बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात स्वतः सिंदखेडराजाचे पोलिस श्रावण डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक तसेच समूळ उच्चाटन अधिनियम २०१३ मधील कलम २ व कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. यानंतर अशाप्रकारे अवैज्ञानिक दावे करुन थोतांडास उत्तेजना देणाऱ्यांना चपराक बसणार आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर हमीद दाभोळकर यांनी बुलढाणा पोलिसांचे अभिनंदन करत पुढील प्रतिक्रिया दिली आहे.
“महा मृत्युंजय यंत्राच्या द्वारे समृद्धी मार्गाच्या वरील अपघात टाळण्याचा दावा करणाऱ्या श्री स्वामी समर्थ केंद्र समन्वयक सिंदखेराजा यांच्या वर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. बुलढाणा पोलिसांची तत्परतेने कारवाई.चमत्काराचा थेट दावा करणाऱ्या प्रवृत्ती थोपवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रभावी वापर कसा केला जाऊ. शकतो याचे उत्तम उदाहरण आहे.बुलढाणा पोलिसांचे अभिनंदन”.