कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योगा आणि क्रिडा उपसंचालक औरंगाबाद विभागाच्यावतीने शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नाका ते छावणी परिसरापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
X
औरंगाबाद // कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने योगा आणि क्रिडा उपसंचालक औरंगाबाद विभागाच्यावतीने शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नाका ते छावणी परिसरापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात उपसंचालक यांनी हिरवी झेंडी दाखवून सेकंड रॅलीचे उद्घाटन केले.
शहरात कारगिल विजय दिनानिमित्ताने क्रीडा विभागाच्या वतीने शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी मोंढा नाका ते छावणी येथील स्मारकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून शहरातील क्रांती चौक परिसरात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहीद जवानांना मानवंदना दिली.
यावेळी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील नागरिकांसह लष्करी जवान आणि अधिकारी, तसेच क्रिडा विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचे नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.