Home > News Update > कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झालेल्या राज्यांची नावे जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झालेल्या राज्यांची नावे जाहीर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झालेल्या राज्यांची नावे जाहीर
X

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने देशात भयंकर परिस्थिती निर्मण केली. या लाटेत मृतांची संख्या जास्त होती. याच दुसऱ्या लाटेत देशात तब्बल 798 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने जाहीर केली आहे. IMAने राज्यनिहाय मृत्यू झालेल्या डॉक्टरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक 128 मृत्यू हे दिल्लीमध्ये झाले आहेत. तर त्यानंतर बिहारमध्ये 115 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर उत्तर प्रदेश- 79, प. बंगाल – 62, राजस्थान – 44, झारखंड – 39, आंध्रप्रदेश – 40, महाराष्ट्र- 23, केरळ- 24, पुद्दूचेरीमध्ये केवळ एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीच कोरोना संकटात डॉटक्टरांनी केलेल्या सेवेचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर असोसिएशनचे अध्यक्ष जे.ए.जयलाल यांनी ही माहिती प्रसिद्ध केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉक्टरांचा योग्य तो सन्मान करतील, त्यांना सुरक्षा देतील आणि त्यांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करताली अशी अपेक्षा आहे, असे जयलाल यांनी म्हटले आहे. दरम्यान देशात गेल्या 102 दिवसातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक कमी आकडेवारी मंगळवारी नोंदवली गेली. देशात मंगळवारी 40 हजारांपेक्षाही कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली.

Updated : 30 Jun 2021 8:34 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top