Home > News Update > दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर

दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर

दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर
X

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या ( dr. narendra dabholkar ) हत्येला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अजूनही दाभोळकरांच्या हत्येचा छडा तपास यंत्रणांना लावता आलेला नाही आणि सूत्रधारांना पकडण्यात आलेले नाही, अशी खंत डॉ. दाभोळकर यांच्या कन्या मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. “जोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडले जात नाही, तोपर्यंत या देशातील विवेकवादी माणसं सुरक्षित आहेत असे मानता येणार नाही.” असंही मुक्ता दाभोळकर (mukta dabholkar) यांनी म्हटले आहे. या चारही हत्यांचा धागा समान आहे. पण तरीही देशातील तपास यंत्रणांना या हत्यांचा उलगडा करता आलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. दाभोळकरांच्या प्रयत्नांमुळे राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. आता देशभरातील इतर राज्यांमध्येही हा कायदा लागू करण्याची मागणी होत आहे. “डॉ. दाभोळकरांची हत्या करुन विचार संपवता येईल असे मारेकऱ्यांना वाटले होते, पण अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता ही चळवळ सुरू ठेवली आहे,” असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा...

Covid 19: राज्याचा मृत्यूदर कधी घटणार?

…आता बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!

#SushantSinghRajputCase: पार्थ पवारांना काय मिळणार?

कोरोनाच्या (corona) संकटकाळात देशाला वैज्ञानिक दृष्टीकोनाची गरज सर्वाधिक आहे. त्यामुळे 20 ऑगस्टच्या निमित्ताने वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरण्याचा संकल्प करुन डॉ. दाभोळकर यांना आदरांजली वाहण्याचे आवाहनही मुक्ता दाभोळकर यांनी केले आहे.

Updated : 20 Aug 2020 8:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top