कोल्हापूरातील ती हत्या नरबळी नाही, धक्कादायक माहिती आली समोर
X
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीतील एका गावात ७ वर्षांच्या मुलाचा नरबळी दिला गेल्याचा संशय व्यक्त करणारी धक्कादायक घटना घडली होती. पण हा प्रकार नरबळी नसल्याचे सिद्ध झाले आहे आणि या हत्येचे गूढ उलगडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीतील आरव केसरे या लहान मुलाचा मृतदेह हळदी कुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर हा नरबळी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हा नरबळी नसून त्या मुलाच्या वडिलांनीच हत्या केल्याचे समोर आले आहे.
राकेश केसरे असं हत्या करणाऱ्या नराधम बापाचं नाव आहे. आरवचा जन्म त्याच्या आईच्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय राकेश यांना होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये कायम वाद होत होते. याच वादातून राकेशने आरवची हत्या केली, आणि बिंग फुटू नये म्हणून त्याचा मृतदेह लपवून ठेवला आणि अपहरणचा बनाव केला, अशी माहिती समोर आली आहे. राकेश यानेच मुलाच्या अपहऱणाची तक्रारही नोंदवली होती. पण कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात हत्येचा छडा लावला आहे.