Home > News Update > #गावगाड्याचे_इलेक्शन – सर्व महिला उमेदवार

#गावगाड्याचे_इलेक्शन – सर्व महिला उमेदवार

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका रंगात आल्या असताना जालना जिल्ह्यातील टाकळी भोकरदन गावाने निवडणूक न होऊ देता एक मोठा निर्णय घेतला आहे.

#गावगाड्याचे_इलेक्शन – सर्व महिला उमेदवार
X

लन्यातील भोकरदन तालुक्यातील ७ सदस्यांच्या टाकळी भोकरदन ग्रामपंचायतीच्या चाव्या आता सात महिलांच्या हातात आल्या आहेत. अर्ज दाखल झालेल्या महिलांमध्ये सुलोचना गावंडे,सुमन बरकले,सुशीला मगरे,मंगला गावंडे,दुर्गा बरकले,लक्ष्मीबाई गावंडे,सुनीता गावंडे यांचा समावेश आहे....

विशेष म्हणजे राज्यातील गावा-गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडवून गुलाल उधळण्याची प्रत्येक पॅनलने तयारी चालवलेली असताना या गावात यावेळी बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील ज्येष्ठ आणि सर्वच नागरिकांनी बैठक घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.या आधी गावात निवडणूक जवळ आली की वाद ठरलेलाच असायचा.

पण गावातील नागरीकांनी पुढाकार घेऊन सर्वच पक्षांच्या महिलांच्या आग्रहाने थेट ७ महिलांना बिनविरोध निवडून देण्याचा निंर्णय घेतला. सध्या सत्तेसाठी हाणामारीचे प्रकार दिसत असताना या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करुन सर्व सूत्र महिलांच्या हाती देत एक आदर्श निर्माण केला आहे.


Updated : 7 Jan 2021 9:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top