Home > News Update > अनुदानित दिव्यांग शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू: धनंजय मुंडे

अनुदानित दिव्यांग शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू: धनंजय मुंडे

अनुदानित दिव्यांग शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू: धनंजय मुंडे
X

सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी 'गुड न्युज' दिली आहे. दिव्यांग शाळेतील ४८९९ शिक्षक व ६१५९ अन्य कर्मचारी अशा एकूण ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती.

त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने आज (दि. २३) रोजी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

Updated : 23 April 2021 3:35 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top