Home > News Update > भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमातील 69 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण

भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमातील 69 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण

भिवंडीतील मातोश्री वृद्धाश्रमातील 69 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण
X

भिवंडी // वृद्धाश्रमात राहणाऱ्या तब्बल 69 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भिवंडीतील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातून हा प्रकार समोर आला आहे. या सर्व वृद्धांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या वृद्धाश्रमात सुमारे शंभरहून अधिक व्याधीग्रस्त वयोवृद्ध नागरिक वास्तव्यास आहेत. मागील आठवड्यात येथील काही जेष्ठ नागरिकांना ताप आल्याची लक्षणे जाणवू लागली. उपचार सुरु करुनही एका वृद्धाचा ताप कमी न झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने खबरदारी म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

या चाचणीनंतर तब्बल 69 वृद्ध नागरिकांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांना उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महिती वृद्धाश्रम व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळं सध्या जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ओमिक्रॉन हा डेल्टा वेरिएंटपेक्षा सातपट जास्त संक्रमक असल्याचा सांगितलं जात आहे.

Updated : 29 Nov 2021 10:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top