Home > News Update > सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश

सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांत झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. दरम्यान या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने माहिती दिली आहे.

सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश
X

नवी दिल्ली // भारत पाकिस्तान सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याचवेळी भारतीय सैन्याला मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांत झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. दरम्यान या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने माहिती दिली आहे.

या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. दरम्यान सुरक्षा दलाने परिसराला घेराव घालत परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याने जवानांकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. तर अनंतनागमधील नवगाम परिसरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Updated : 30 Dec 2021 9:49 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top