नोटाबंदीचे 5 वर्ष: पत्रकार श्वेता सिंह आणि सुधीर चौधरी सोशल मीडियावर ट्रोल
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी जाहीर केली होती. त्या घटनेला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी केल्यानंतर मीडियाने वेगवेगळे दावे केले होते. हे दावे आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
या व्हिडीओमध्ये पत्रकार नोटाबंदी नंतर दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ही नोटबंदी केली असल्याचं दावा करत आहेत. तसंच नोटाबंदीनंतर मोदी यांनी डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नोटाबंदी केली असल्याचे हे पत्रकार दावा करत होते. मात्र, आज या सर्व पत्रकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
IndiaSpendHindi चे पत्रकार रणविजय सिंह यांनी आज तक च्या Anchor श्वेता सिंह यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या 2000 च्या नोटेमध्ये इलेक्ट्रोनिक चिप असल्याचं सांगत आहेत. या व्हिडीओचं त्यांनी हिंदीमध्ये शिर्षक दिलं आहे. ते म्हणतात...
नोटाबंदी के 5 साल पर खास आपके लिए ये वीडियो. देखें और माथा पीटें
नोटबंदी के 5 साल पर खास आपके लिए ये वीडियो. देखें और माथा पीटें 🤦 pic.twitter.com/qR4ce6HOjx
— Ranvijay Singh (@ranvijaylive) November 8, 2021
तसंच झी न्यूज चे संपादक सुधीर चौधरी यांना देखील लोकांनी ट्रोल केलं आहे.
और ये भी ! दुनिया के सबसे महान वैज्ञानिक श्री सुधीर 2000 के नोट की अत्याधुनिक तकनीक बताते हुए। pic.twitter.com/jixn1Y8Cti
— Hermione tai Grangerkar (@Carl_sagan_fan) November 8, 2021
तसंच Riyaz H.Hala या अकांउटवरुन पत्रकार सुधीर चौधरी यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
😀😀😀 pic.twitter.com/cIcKYsQ3rI
— Riyaz H.Hala🇮🇳🇮🇳🇮🇳 (@riyaz_hala) November 8, 2021