Home > News Update > एअर इंडियावर सायबर हल्ला, 45 लाख लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला

एअर इंडियावर सायबर हल्ला, 45 लाख लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला

एअर इंडियावर सायबर हल्ला, 45 लाख लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला
X

एअर इंडियावर यावर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. ज्यामुळे एअरलाइन्सच्या काही प्रवाश्यांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचं समोर आलं आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

नुकतंच एअर इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. 11 ऑगस्ट 2011 आणि 3 फेब्रुवारी 2021 दरम्यान नोंदणीकृत एअर इंडियाच्या प्रवाश्यांची विशिष्ट माहिती लीक झाली आहे. ज्यात नाव, जन्मतारीख, संपर्क, पासपोर्ट, तिकिट माहिती आणि क्रेडिट कार्ड यांचा डाटा समाविष्ट आहे.

एअर इंडियाकडून एक निवेदन जारी केलं आहे. आम्ही आमचे डाटा प्रोसेसर सतत सुरक्षात्मक पावलें उचलत आलो आहोत. आम्ही प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तसेच आवश्यक त्या साधनांचे पासवर्डस बदलण्याचे आवाहन करत आहोत.

एसआयटीएवरील सायबर हल्ल्यामुळे एअर इंडियाच्या प्रवाश्यांसह जगभरातील 45 लाख प्रवाशांच्या डाटा चोरीला गेला आहे. त्यामध्ये एअर इंडियाच्या माहितीचा समावेश आहे.

फोरेंसिक विश्लेषणाद्वारे सायबर हल्ल्याची व्याप्ती शोधली जात आहे. त्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे.

Updated : 23 May 2021 5:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top