Home > News Update > हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले

हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले
X

राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तिकडे जळगावच्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडत असून सततच्या पावसाने हतनूर धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

मध्यप्रदेश आणि विदर्भात काही काळ उघडीप दिलेल्या वरुणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी दिली. त्यामुळे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचा पाणी साठा वाढला आहे. धरणाचे 41 दरवाजे उघडल्याने तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

1,06,122 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

काल रात्री 9 वाजता हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 1,06,122 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेता नदी पात्रात विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधान राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Updated : 23 July 2021 10:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top