सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील दुर्घटनेचे पडसाद अधिवेशनात
X
मुंबई : महानगरपालिकेच्या भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटलेत.
दरम्यान याच मुद्यावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या बालकांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करत निलंबित केलं पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान आजही एका बालकाचा मृत्यू झाला आहे. हे किती गंभीर आहे असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हे कोणाला नाकारता येणार नाही. मात्र, यात दोषी कोण? याची चौकशी तर आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. दोषीला शिक्षा झालीच पाहिजे निर्दोषला शिक्षा होता कामा नये. संबधित आरोग्य विभागाचे MOH अधिकारी यांचे निलंबन करण्यात आलं आहे.