दादांनी दादांचं ऐकलं, आमदारांना १ कोटी खर्च करण्यास मंजूरी...
X
राज्यातील कोरोनाचे वाढते संकट ध्यानात घेता आमदार निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये सार्वजनिक रुग्णालयांना मदत म्हणून मंजूर करावेत व प्राधान्याने प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ही मागणी केली होती.
राज्य सरकारने आमदारांना विकासनिधी वाढवून दिला आहे. त्यापैकी काही निधी थेट कोरोनाच्या प्रतिबंधासाठी वापरणे व त्या माध्यमातून सार्वजनिक रुग्णालयांना मदत करण्याची गरज आहे. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. ती आज अजित पवार यांनी मान्य केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक झाली. आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व आमदारांना त्यांच्या मतदार संघातील कामासाठी देण्यात येणाऱ्या आमदार निधीपैकी 1 कोटी रुपयाचा निधी कोरोना वापरासाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आमदारांना प्रत्येक वर्षात 4 कोटी रुपये आमदार निधी दिला जातो. त्यातील १ कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघात खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. आमदार निधीतून 350 कोटी महाराष्ट्रात ीकोरोनावर खर्च करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
कडक लॉकडाऊनची गरज…
मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी असेही म्हटले आहे की, जर लोक निर्बंधाला योग्यप्रकारे प्रतिसाद देत नसतील तर गेल्या वर्षीप्रमाणे त्यांच्यावर निर्बंध घालण्याची वेळ येऊ शकेल.
रेमडीसीवरची सगळ्यांनाच गरज नाही…
तज्ज्ञ सांगतात की, कोरोनातील 25 ते 30 टक्के रुग्ण किंवा जास्तीत-जास्त 40 टक्के रुग्णांनाच रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकता असते. खासगी रूग्णालयात डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसीवर इंजेक्शनची मागणी करतात. मी डॉक्टरांना विनंती करतो आहे की, प्रत्येक रुग्णांना रेमडिसीवर इंजेक्शनची गरज असतेच असं नाही. उगाच मागणी करू नये. ज्यांना खरोखरच आवश्यकता आहे. अशा लोकांनाच हे इंजेक्शन द्यावं. आम्ही रेमडिसिवरची मागणी पुरवण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही करत आहोत.