Home > News Update > केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ
X

केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची गोड होणार आहे. केंद्रीय नोकरदार आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ प्रस्तावित होती त्याला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत याबाबत घोषणा केली.

यावेळी ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे . महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर 9488 कोटींचा भार पडणार आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर आता 5030 रुपये महागाई भत्ता मिळतो. सध्या डीए मूळ वेतनाच्या 28% आहे ,आता त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजेच तो 31 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये असल्यास, DA 540 रुपयांनी वाढेल. मूळ पगार जितका जास्त तितका जास्त डीए मिळेल. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ मंजूर केली होती.

Updated : 22 Oct 2021 7:32 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top