मुंबई च्या सेंट जोसफ स्कूल मध्ये 22 विद्यार्थ्यांना कोरोना
X
देशात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील सेंट जोसेफ बोर्डिंग स्कूल आग्रीपाडा मध्ये 22 विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामधील 4 मुलं 12 वर्षाच्या खाली आहेत. यामधील काही विद्यार्थ्यांना नायर हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. शाळेतील 95 व्यक्तींचे टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यामध्ये 22 विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने या शाळेची इमारती सील केली आहे. दरम्यान आज मुंबईत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईत कोरोनाच्या डेल्टा विषाणूचे तब्बल १२८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विषाणू तपासणी मशीनमध्ये मुंबईमधील 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 128 नमुने हे डेल्टा प्लसचे विषाणूचे असल्याचे समोर आले आहेत, त्याचप्रमाणे इतर राज्यात आढळत असलेल्या विषाणूचे नमुनेसुद्धा यामध्ये सापडले आहेत, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांनी नियम पाळले नाही तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा आधीच दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे अन्यथा अशाप्रकारे रुग्णसंख्या वाढत राहिली तर पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल, अशा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
२५ ऑगस्टला मुंबईत एकूण ३४३ रुग्ण आढळले होते. तर २४ तासात २७२ रुग्ण बरे झालेले होते. आतापर्यंत मुंबईत ७२०७५० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाचे मुंबईत २८५५ एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १८८४ दिवस असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे,.