Home > News Update > छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी, अजित पवारांची घोषणा

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी, अजित पवारांची घोषणा

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी, अजित पवारांची घोषणा
X

राज्याचे वर, २०२२-२३ साठीचे बजेट अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केले. या बजेटमध्ये अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली, ती म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांचे भव्य स्मारक पुणे जिल्ह्याती हवेली येथे उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी सरकारने मोठी तरतूदी केली आहे. २५० कोटी रुपये या स्मारकासाठी देण्यात येणार आहेत.

छत्रपती संभाजीराजे यांची पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे समाधी आहे. येथेच छत्रपती संभाजी महाराजांचे यांचे स्मारक बांधले जाणार आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर बजेटच्या सुरूवातीलाच त्यांनी स्मारकाची घोषणा केली. एवढेच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र शौर्य पुरस्कार देण्याचीही घोषणा यावेळी अजित पवारांनी केली.


Updated : 11 March 2022 4:31 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top