Home > News Update > जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 21 शेळ्या ठार

जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 21 शेळ्या ठार

जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 21 शेळ्या ठार
X

पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या माणकेश्वर व सुकाळवेढ गावात बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात 21 शेळ्या ठार झाल्या आहेत. माणकेश्वर येथील हनुमंत दगडू कोरडे यांच्या 3 शेळ्या बिबट्यांनी ठार केल्यात. तर मन सुकाळवेढा येथे दोन बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात महादू ढेंगळे याच्या तब्बल 18 शेळ्या ठार झाल्यात.

दरम्यान जुन्नर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकदा शेतात एकट्याने जाण्यास नागरिक घाबरत आहे. वन विभागाने या घटनेची दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा करून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजराही लावला आहे. या भागात वनाचे प्रमाण अधिक असल्याने या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव , शिरूर ,जुन्नर , खेड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर अधिक आहे. अनेकवेळा ऊस तोडणी कामगार व शेतकऱ्यांनाही बिबट्याचे दर्शन होते.

Updated : 6 Dec 2021 10:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top