400 जणांनी केलेल्या बलात्कार प्रकरणी पोलीस अटकेत
X
अंबाजोगाई अल्पवयीन अत्याचार प्रकरणी एक पोलिस कर्मचारी,एक होमगार्ड व एक सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह २० जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
आता पर्यंत 20 आरोपींना अटक करत पोलिसांची गेल्या 24 तासात 8 अरोपींना अटक करण्याची धाडशी कार्यवाही....!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील 400 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पोलिसांनी आता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि एका होमगार्डला अटक केली आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलीस या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. पोलिसांनी तीन व्यक्तींना अटक केल्यानंतर तालुक्यात हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सहा महिन्यांपासून घराबाहेर राहत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर ४०० पेक्षा अधिक जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईच्या ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एक - एक धक्कादायक बाबी पुढे येवू लागल्या आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण, सहा महिन्यांत ४०० हून अधिकांनी केले अत्याचार
या प्रकरणात पोलिसांनी दोन महिला दलालांना व मुख्याध्यापकासह इतर सात आरोपींना 17 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेही अत्याचार केल्याचं आरोपामध्ये म्हटलेलं होतं. पोलीस कर्मचार्याचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवरच ताशेरे ओढत आरोपीला अटक का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत केला होता.
या वेळी न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांनी गेल्या 24 तासात आणखी आठ जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी एक होमगार्ड लॉज मालक असलेला एक माजी नायब तहसीलदार व इतर एक लॉज चालक एक लॉजचा मॅनेजर सह अन्य इतरांचाही समावेश आहे दरम्यान या प्रकरणात आज पर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली करण्यात आली याबाबत पोलीस अधीक्षक कविता नेहरकर निरकर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही मात्र या प्रकरणात 400 पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित करून करण्यात आलेला असल्याने तपासाचे मोठे आव्हानच पोलिसांसमोर उभे आहे.