गुजरात भरुच रुग्णालयात आग, 2 नर्ससह 16 रुग्णांचा मृत्यू
X
गुजरातच्या भरूच मधील वेलफेयर रुग्णालयात आग लागल्यानं 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन नर्स आणि 16 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात 50 रुग्ण होते. त्यांना स्थानिक लोकांनी बाहेर काढले. गेल्या महिन्यांपासून या रुग्णालयाचा उपयोग कोरोनाच्या रुग्णांसाठी केला जात आहे. रात्री एक वाजता ही घटना घडली.
मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत व्यक्तींच्या परिवाराला 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. असं रुपाणी यांनी म्हटलं आहे.
या घटनेत काही रुग्णांचे मृतदेह इतके जळाले आहेत. की, यामध्ये रुग्णांची ओळख पटवणं मुश्किल झालं आहे. या घटनेला रुग्णालय जबाबदार असल्याचं रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. या रुग्णालयाला लागलेली आग इतकी मोठी होती की, रुग्णालयाचा ICU Ward पुर्ण पणे जळून खाक झाला आहे. वाचलेल्या रुग्णांपैकी काहींची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतंय. सध्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं असून रुग्णांवर उपचार सुरु आहेत.