Home > News Update > Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्या 177 जणांना वाचवण्यात यश, 96 लोक बेपत्ता, मदत कार्य सुरुच...

Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्या 177 जणांना वाचवण्यात यश, 96 लोक बेपत्ता, मदत कार्य सुरुच...

Tauktae Cyclone: मुंबईजवळ समुद्रात अडकलेल्या 177 जणांना वाचवण्यात यश, 96 लोक बेपत्ता, मदत कार्य सुरुच...
X

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले 'तौत्के' हे वादळ आता शांत झालं आहे. या वादळादरम्यानच 'बॉम्बे हाय' या तेल क्षेत्राजवळच 'बार्ज'वर (लोकांच्या राहण्यासाठी सपाट जहाजावर केलेली सुविधा) काही माणसं अडकली आहेत. बॉम्बे हाय येथे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. या ठिकाणी सुमारे 273 लोक अडकल्याची माहिती 17 मेला मिळाली होती. हे अंतर मुंबई शहरापासून हे अंतर 176 किलोमीटर अंतर दूर आहे.

या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या INS कोची आणि INS तलवार या नौका 17 मेलाच दुपारी रवाना झाल्या होत्या. या नोकाचं बचाव कार्य सुरु असून यातील 177 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर 96 लोक बेपत्ता आहेत.

दरम्यान एका ठिकाणी मुंबईपासून 88 किलोमीटर अंतरावर 137 लोक अडकले आहेत. या लोकांना आणण्यासाठी नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान या वादळात रात्री उशीरापर्यंत लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, वाऱ्याचा वेग आणि अंधार असल्याने रात्री मदतकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळपासून मदत कार्य सुरु केलं आहे. समुद्र खवळला असताना या लोकांना वाचवण्याचं काम कठीण असणार आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने भारतीय हवाई दलाची मदत घेतली आहे.

Updated : 18 May 2021 3:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top