156 आंतरराष्ट्रीय प्रवासी अहमदनगर जिल्ह्यात दाखल ; आरोग्य यंत्रणा सतर्क
X
अहमदनगर // मागील काही दिवसांपासून कोरोनाचा व्हेरिएंटने महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढली आहे. देशामध्ये अनेक राज्यामध्ये ओमिक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असताना आता अहमदनगर जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झालेत. यामध्ये तब्बल 86 प्रवासी ओमिक्रॉनचा उगम झालेल्या देशातून किंवा ओमिक्रॉनचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातून आलेत.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. शुक्रवारी आणखी 24 प्रवाासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 156 आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झालेत. यातील 130 जणांचा शोध घेण्यात आला आहे. मात्र, उर्वरित 26 जणांचा अद्याप शोध सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढताना दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर, देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाने भविष्यातील धोका लक्षात घेत आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध घातलेत. तर ओमिक्रॉनचा उगम झालेल्या किंवा कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असणाऱ्या देशांवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं आहे. ओमिक्रॉनच्या हाय रिस्क देशांची यादीही प्रशासानाकडून जारी करण्यात आली होती.अशाच देशातून अहमदनगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे